कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी अर्थात ‘मुडा’ कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ही कारवाई पीएमएलए कायद्याअंतर्गत केली आहे.
92 मालमत्ता जप्त
म्हैसूरच्या लोकायुक्त पोलिसांनी यापूर्वीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच इतरांविरोधात आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. त्यासाठी राज्यपालांनी सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालविण्याची विशेष परवानगी दिली होती. ईडीने मंगळवारी एकूण 92 मालमत्ता जप्त केल्या. बाजार भावानुसार त्याचे मूल्य 100 कोटी रुपये आहे.
