Search
Close this search box.

Kolhapur Crime: हॉलपासून किचनपर्यंत रक्ताचा सडा, चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्येच अडकला, कोल्हापूर हत्याकांडाचा भीषण शेवट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यातील पुरोगामी शहर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहत होते. मात्र, अलीकडेच त्यांच्यात वाद झाल्यामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीसोबत राहू लागली होती. गेल्या काही काळापासून सतीश यादव हा लग्नासाठी समीक्षाच्या मागे लागला होता. मात्र, सतीशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समीक्षाने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या सतीशने समीक्षा पुन्हा घरी आल्यानंतर तिचा निर्घृणपणे खून केला. यानंतर सतीश यादव याने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळगावी जाऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

समीक्षा नरसिंगे ही सतीश यादव याच्यासोबतचे नाते तोडल्यानंतर मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती. या दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होत्या. या दोघांमधील वादामुळे समीक्षाला भाड्याचे घर सोडण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ती आपल्या आईच्या घरी राहत होती. मंगळवारी समीक्षा आपले सामान आणण्यासाठी मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील घरी सामान आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने सतीशला फोन केला होता. समीक्षा त्याठिकाणी आल्याचे कळताच पुढच्या 15 मिनिटांत सतीश तेथे पोहोचला. यानंतर दोघांमध्ये लग्नावरुन पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. मैत्रिणीने दोघांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या सतीशने त्याच्याकडे असलेला चाकू जोरात समीक्षाच्या छातीत खुपसला. सतीशने चाकू इतक्या जोरात खुपसला होता की, तो थेट बरगड्यांपर्यंत पोहोचला.

छातीत चाकू घुसल्यानंतर समीक्षा जागेवर कोसळली. त्यानंतर सतीश यादव तिला लाथा घालून घराबाहेर निघून गेला. यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने फोन करुन आपल्या मित्रांना बोलावून घेतले. या सगळ्यांनी जखमी अवस्थेतील समीक्षाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Kolhapur Murder: समीक्षाच्या कुटुंबीयांना धक्का

समीक्षा नरसिंगे हिच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले होते. चार वर्षांपूर्वी समीक्षाचे लग्न झाले होते. मात्र, ती आपल्या नवऱ्यासोबत राहत नव्हती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने समीक्षा सतीशसोबत लग्न करायला तयार नव्हती. समीक्षाची आई मासेविक्री करते. तर समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करुन कुटुंब चालवण्यासाठी हातभार लावत होती. समीक्षाची हत्या झाल्याने तिच्या आई आणि भावंडांना मोठा धक्का बसला आहे.

Kolhapur murder live in relationship: पोलिसाच्या घरात रक्ताचा सडा, घटनास्थळी भयंकर दृश्य

समीक्षा आणि तिची मैत्रीण ज्या घरात राहत होते, ते एका पोलीस कर्मचाऱ्याचे होते. सतीश आणि समीक्षा यांच्यात भांडण झाल्यानंतर मैत्रिणीने वाद सोडवायचा प्रयत्न केला. तिने सतीशला चाकू मारण्यापासून अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिला यश आले नाही. सतीशने चाकू जोरात समीक्षाच्या छातीत घुसवला. हा चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्ये अडकल्याने बाहेर निघत नव्हता. घरात हॉलपासून ते किचनपर्यंत समीक्षाच्या रक्ताचा सडा पडला होता. सतीश यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. तो शिवाजी पेठेत क्लब चालवायचा. समीक्षाने त्याला अनेकदा दुसरे काहीतरी काम कर, असे सांगितले होते.

सतीशने पुन्हा लग्नासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वाद आणखी वाढल्याने सतीशने अत्यंत निर्घृण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने वार केले.  छातीत खोलवर वाद झाल्याने समीक्षा जाग्यावर कोसळी. त्यानंतरही सतीशने तिच्यावर लाथांचा प्रहार करून बाहेरून घराचा दरवाजा बंद करून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला मैत्रीणीने मित्राच्या मदतीने पहिल्यांदा खासगी रुग्णालयानंतर सीपीआरमध्ये उपचाचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

admin
Author: admin

और पढ़ें