Search
Close this search box.

घरात घुसून आईसमोरच छातीत गोळ्या झाडल्या; 17 वर्षीय कंटेट क्रिएटरची हत्या, सापडलं CCTV फुटेज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पाकिस्तानमधील एका 17 वर्षीय कंटेंट क्रिएटर असलेल्या तरुणीची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामाबादमध्ये घडला आहे. सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानी टिकटॉक स्टार सना युसूफची एका व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने सना युसूफशी ऑनलाइन फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने त्याला वारंवार नाकारलं होतं. याच रागातून त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. विशेष म्हणजे गुरुवारी 29 मे रोजी 17 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर चौथ्या दिवशीच सनाचा मृत्यू झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आरोपीला अटक

सनाच्या सोशल मीडिया अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सनाच्या तिच्या राहत्या घरी आई आणि काकूसमोर हत्या करण्यात आली. तिच्या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी फैसलाबाद येथील रहिवासी उमर हयात वर्षीय तरुणाला अटक केली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सानावर हल्ला होण्याच्या काही दिवस आधीपासून 22 वर्षीय उमर हयात तासनतास तिच्या घराबाहेर फिरत होता. त्यामुळेच उमर हयातला पोलिसांनी अटक केली आहे. तो सनाच्या घरातून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं.

 

पत्रकार परिषदेत केला खुलासा

इस्लामाबादचे पोलिस प्रमुख सय्यद अली नासिर रिझवी यांनी सनाच्या हत्येसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. “सनाची हत्या झाल्याचं प्रकरण हे वारंवार नकार दिल्याच्या रागातून घडलेलं आहे. आरोपी मुलगा तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता,” असं रिझवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तिने वारंवार नकार दिला

“राक्षसी वृत्ती असेला आणि निर्दयीपणे सनाचा खून करणारा आरोपी आता कायद्याच्या कचाट्यात आहे,” असंही रिझवी म्हणाले. संशयित आरोपीला सनाशी ऑनलाइन “मैत्री” करायची होती. मात्र तिने त्याला वारंवार टाळल्याचं सध्या उपलब्ध पुराव्यांवरुन स्पष्ट होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या एका चुकीमुळे सापडला आरोपी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर हयातने फक्त मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले आहे. उमर हयातच्या घरची परिस्थिती तशी बेताची असून त्याच्या ‘उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. गोळीबारानंतर पुरावे पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आरोपीने सना युसूफचा मोबाईल फोन सोबत नेला. यामुळेच तो पकडला गेला.

आईने सांगितलं नक्की घडलं काय

17 वर्षीय सनाच्या आईने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये घटनाक्रमाची माहिती दिली आहे. गोळीबार करणारी व्यक्ती संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पिस्तूल घेऊन घरात शिरली. त्या व्यक्तीने माझ्या मुलीवर अगदी जवळून गोळीबार केला. तिच्या छातीत दोन गोळ्या लागल्या आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तरी आम्ही तिला वाचवू शकलो नाही, असं सनाच्या आईने म्हटलं आहे.

आरोपीने गुन्हा कबुल केला

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी एक्स वर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आरोपीने हत्येची कबुली दिली आहे आणि शस्त्र सापडले आहे, ज्यामुळे हत्येशी ऑनर किलिंगचा संबंध असल्याच्या प्राथमिक अहवाल चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.

नेमके कशावर व्हिडीओ बनवयाची?

सना खैबर पख्तूनख्वामधील अप्पर चित्रालचा रहिवाशी होती. चित्रली परंपरा आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या व्हिडिओंमुळे त्याने सोशल मीडियावरुन अल्पावधीत लोकप्रियता मिळवली होती. तिच्या टिकटॉक व्हिडिओंद्वारे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. टिकटॉकवर सना युसूफ चित्रली संस्कृती, महिलांच्या हक्कांसाठी बोलणं आणि शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करायची. यासाठी तिचं तिच्या फॉलोअर्सकडून कौतुक व्हायचं.

admin
Author: admin

और पढ़ें