Search
Close this search box.

सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी, संजय राऊतांचा फोनवरुन निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते.  या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.

सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.  महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते.

महत्त्वाचं म्हणजे सुधाकर बडगुजर यांनी कालच दावा करत, विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या पत्रकार परिषदेकडे नाशिकसह राज्याचं लक्ष लागलं आहे.

महानगर प्रमुख विलास शिंदे, खासदार राजभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख  डी जी सूर्यवंशी नेमकं काय म्हणाले?

काल गिरीश महाजन बडबडले, शिवसेना रहाणार नाही, पण शिवसेनेमुळे भाजप वाढली. तुम्हाला पालकमंत्री देता येत नाही, तुम्ही पक्ष संपवायला निघाले. ही शिवसेना कधीच संपणार नाही, सर्व कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत.  इथे सर्व आहेत हे डबलरोल आहेत का? भाजपने मागील काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता प्रकरण बाहेर काढले, मग आता त्यांना मुख्यमंत्री भेट का देतात? नाशिकमध्ये शिबिर झाले, त्यानंतर कसली नाराजी? सुधाकर बडगुजर वैयक्तिक कामासाठी बाहेर आहेत. सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत.

दत्ता गायकवाड, माजी जिल्हा प्रमुख

शिवसेनेत नियुक्तीचे निर्णय उद्धव ठाकरे घेतात आणि सामनामधून जाहीर केले जाते. बडगुजर उपनेते झाले तेव्हा कोणाला विचारले होते?

संजय राऊतांचा फोन, बडगुजरांची हकालपट्टी

दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

सुधाकर बडगुजर नेमकी काय भूमिका घेणार? 

दरम्यान, सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमधील ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते नाराज असल्याचं सांगत, ठाकरे गटाची धाकधूक वाढवली होती. त्यामुळे ठाकरे गट पत्रकार परिषद घेऊन नेमकी काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसरीकडे सुधाकर बडगुजर हे येत्या काळात कोणती राजकीय भूमिका जाहीर घेणार, याचीही उत्सुकता आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर? (Who is Sudhakar Badgujar)

– सुधाकर बडगुजर हे  नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख होते.

– संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून सुधाकर बडगुजर ओळखले जात

– वर्ष 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

– 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.

– त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.

– तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता.

– यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.

– अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले.

– पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले.

– 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला.

– गेल्या 15 वर्षापासून ते नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर ते कार्यरत होते.

– विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्याकडे बघितलं होतं

admin
Author: admin

और पढ़ें