सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीनंतर देशांतर्गंत वायदे बाजारात शुक्रवारी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं MCX वर 600 रुपयांपेक्षा जास्त घसरले आहे. चांदी जवळपास 1 हजार रुपयांनी घसरली आहे. MCXवर सोनं 614 रुपयांनी घसरून 94.775 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करतेय. काल सोनं 95.389 रुपयांवर स्थिरावले होते. चांदी या दरम्यान 967 रुपयांनी घसरून 96,859 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली होती. काल चांदी 97.826 रुपयांवर स्थिरावली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखी सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 0.60 टक्के म्हणजेच 20.10 डॉलरच्या घसरणीनंतर 3323.80 डॉलर औंसवर ट्रेड करताना दिसत आहे. त्याच वेळी, सोन्याचा जागतिक स्पॉट भाव प्रति औंस $3300.83 वर व्यवहार करताना दिसला, जो 0.52 टक्क्यांनी किंवा $17.11 ने कमी झाला.
सोन्यासोबतच, चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतींमध्येही घसरण दिसून आली आहे. एमसीएक्सवर, 4 जुलै 2025 रोजीच्या डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव सुरुवातीच्या व्यवहारात 0.55 टक्क्यांनी किंवा 536 रुपयांनी घसरून 97,290 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 89, 200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 97, 310 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 72,990 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,731रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,920 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,299 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 77,848 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 71,360 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,392रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 89, 200 रुपये
24 कॅरेट- 97, 310 रुपये
18 कॅरेट-72,990 रुपये
