या कार्यक्रमाच्या माध्यमातून NMACC चं आंतराष्ट्रीय पटलावर पदार्पण होईल. NMACC ची सुरुवात या सांस्कृतिक केंद्राची 2023 मध्ये मुंबईत झाली. नीता अंबानी यांनी ‘द मेट’ आणि ‘सिडनी ऑपेरा हाऊस’ यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थांकडून प्रेरणा घेतली. हे केंद्र उभारण्यासाठी त्यांनी एक दशकाहून अधिक काळ यावर काम केलं. पारंपरिक नृत्य आणि संगीतापासून ते ग्लोबल व्हिज्युअल आर्ट पर्यंत भारताच्या कलात्मक वारशाचे विविध पैलू साजरे करण्यासाठी ही जागा बनवण्यात आली आहे.
न्यूयॉर्कमधील NMACC Weekend ची सुरुवात ‘ग्रँड स्वागत’ नं होईल. हा कार्यक्रम फक्त निमंत्रित लोकांसाठी असेल. यामध्ये मनिष मल्होत्रा यांनी तयार केलेलं ‘स्वदेश’ फॅशन कलेक्शन दाखवलं जाईल. तसेच, मिशेलिन स्टार शेफ विकास खन्ना खास भारतीय जेवण बनवणार आहेत.
या कार्यक्रमात शंकर महादेवन, श्रेया घोषाल आणि शास्त्रीय संगीतकार ऋषभ शर्मा यांच्या संगीताचे कार्यक्रम होतील. NMACC निर्मित आणि फिरोज अब्बास खान दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन म्यूजिकल: सिव्हिलायजेशन टू नेशन’ हे नाटक लिंकन सेंटरमध्ये आंतराष्ट्रीय पदार्पण करेल. या नाटकात भारताचा 7,000 वर्षांचा इतिहास संगीत, नृत्य आणि रंगमंच बदल करून दाखवण्यात आला आहे.
या प्रदर्शनात फक्त सशुल्क कार्यक्रम नसतील, तर दमरॉस पार्क मधील काही कार्यक्रमात मोफत प्रवेश असेल. ज्यात एडी स्टर्न यांच्यासोबत सकाळी योगासनं, क्रिकेटवरील चर्चासत्र, शामक दावर यांच्यासोबत बॉलिवूड डान्स क्लास आणि स्वदेश मार्केटप्लेस मधील भारतीय कला आणि हस्तकला यांचे प्रदर्शनाचा समावेश असेल.
नीता अंबानी म्हणाल्या, “संस्कृती लोकांना एकत्र आणते; ती सहानुभूती वाढवते.” त्या पुढे म्हणाल्या, “मी भारताचा काही अंश आणि 5,000 वर्षांच्या कथा न्यूयॉर्कमध्ये सादर करण्यासाठी उत्सुक आहे.”









