Search
Close this search box.

ऑनलाईन सुरा मागवला, स्वतःचा गळा चिरला; भोपाळ AIIMS मध्ये शिकणाऱ्या बीडच्या मुलाची पुण्यात आत्महत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कुटुंबाकडून होणाऱ्या अभ्यासाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या बीडमधील एका विद्यार्थाने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. उत्कर्ष महादेव हिंगणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो भोपाळमधील एम्स रुग्णालयात (Bhopal AIIMS) वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याने ऑनलाईन सुरी मागवून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी सकाळी पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथील बाथरूममध्ये उत्कर्ष हिंगणे (Utkarsh Shingne) याने आत्महत्या केली. तो पुण्यातील एएफएमसीमध्ये एका कार्यक्रमासाठी आला होता. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की तो अभ्यासामुळे तणावाखाली होता आणि म्हणूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं. या प्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.

Utkarsh Shingne Suicide : ऑनलाईन सुरी मागवून गळा चिरला
उत्कर्ष हिंगणे याने ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून सुरी मागवली आणि स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून उघडकीस आलं आहे. कुटुंबाकडून अभ्यासाचा अधिक तणाव होता. तो तणाव सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली.

Utkarsh Shingne WhatsApp Suicide Note : सुसाईड नोट लिहिली
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअॅपवर एक कथित सुसाईड नोट पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी मेसेज पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू उघडकीस आला. त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सकाळी 6.15 वाजता घटनेची माहिती देण्यात आली.

उत्कर्ष हिंगणेचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात नेण्यात आला. वानवडी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला.

admin
Author: admin

और पढ़ें