Search
Close this search box.

FAKE NEWS : भारतीय महिला पायलटला पकडल्याचा दावा, PIB ने पाकचा बुरखा टराटरा फाडला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा भारतीय सैन्यदल रोज पुराव्यासह टराटरा फाडत आहे. फोटो आणि व्हिडीओ दाखवून भारताने पाकिस्तान सरकार आणि मीडियाच्या फेकन्यूज उघड्या पाडल्या आहेत. भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र भारताच्या पीआयबीने (Press Information Bureau) हे वृत्त फेक असल्याचं सिद्ध केलं आहे.  भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग (Shivani Singh) यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे.

पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया हँडलवरून दावा केला जात आहे की भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आले आहे. हा दावा खोटा आहे, असं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे. पाकिस्ताननं अनेक फेक न्यूज पसरवल्या आहेत. भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडून दिशाभूल होत आहे. पाकचे खोटे दावे भारताने फेटाळले आहेत.

पाकिस्तानचे अनेक दावे पुराव्यासह खोडून काढले

दरम्यान, आज सकाळी भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत पाकिस्तानने केलेल्या दावे पुराव्यासह खोडून काढले. हतबल, हताश आणि वैफल्यग्रस्त पाकिस्तान भारताच्या नागरी वस्त्यांना टार्गेट करत आहे. शिवाय भारताच्या हवाई तळांनाही टार्गेट केल्याचा पाकिस्तानने केला होता. मात्र कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडटर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट आज सकाळचे फोटो वेळेसह दाखवले. सिरसा आणि सुरतगड हवाईतळ उडवल्याचा दावा पाकिस्तानकडून कऱण्यात येत होता. मात्र आज सकाळचे फोटो दाखवून पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने पुन्हा पुराव्यासह खोडून काढला.

 

admin
Author: admin

और पढ़ें