प्रत्येक भारतीयाला आज आपल्या सैनिकांचा अभिमान वाटत आहे. नागरिक सैनिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय सैन्याला सलाम ठोकला आहे. सैनिकांचे आभार मानले आहेत. या कठीण परिस्थितीत ते देशाचे रक्षण करत आहेत. अनुष्काचे वडील स्वतः कारगिलच्या युद्धात लढले होते. याबाबत तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
अजय कुमार शर्मा, अनुष्काचे वडील, हे आर्मीत कर्नल होते. ते आता निवृत्त झाले आहेत. कारगिल युद्धाच्या वेळच्या आठवणी आणि आईची अवस्था अनुष्काला अजूनही आठवते. तो काळ आठवून तिला आजही भीती वाटते. अनुष्काचे वडील 1982 पासून निवृत्त होईपर्यंत प्रत्येक मोठ्या आर्मी ऑपरेशनमध्ये सहभागी होते. कारगिल युद्धासोबतच ते ऑपरेशन ब्लू स्टारमध्येही होते.
अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा हे लष्करात कर्नल होते. ते आता निवृत्त झाले आहेत. अनुष्कानं सांगितलं होतं की, जेव्हा तिचे वडील कारगिल युद्धात लढत होते, तेव्हा ती ११ वर्षांची होती. त्यावेळी तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण, त्यावेळचं घरचं वातावरण आणि वडिलांचे फोनवरील बोलणं तिला आठवतं. अनुष्का तिच्या आईला पाहून घाबरत होती. कारण तिची आई सतत बातम्या बघत असे.
अनुष्का शर्माने २०१२ मध्ये ‘ईटाइम्स’ला एक मुलाखत दिली होती. त्यात तिनं सांगितले होतं की, “कारगिल युद्ध आमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण होतं. मी त्यावेळी खूप लहान होते. पण, मी माझ्या आईला पाहून घाबरत होते. ती दिवसभर न्यूज चॅनल लावून ठेवायची. जेव्हा कोणी शहीद झाल्याची बातमी यायची, तेव्हा ती खूप दुःखी व्हायची.”
अनुष्कानं पुढे सांगितलं, “जेव्हा माझे वडील फोन करायचे, तेव्हा ते जास्त काही बोलू शकत नव्हते. पण, मी माझ्या शाळेबद्दल, मित्रांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलत राहायचे. ते युद्ध लढत आहेत, याची मला जाणीवही नव्हती. मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की, मी एक अभिनेत्री असण्यापेक्षा एका आर्मी ऑफिसरची मुलगी आहे.”
अनुष्का शर्मा नं आपल्या वडिलांबद्दल बोलताना खूप अभिमान व्यक्त केला. तिनं सांगितले की, ती एक अभिनेत्री असण्यापेक्षा एका सैनिकाची मुलगी आहे, याचा तिला जास्त अभिमान आहे.
