Search
Close this search box.

लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 कधी जमा होणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळं राज्यातील लाखो महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता कधी खात्यात जमा होणार? याची अखेर माहिती समोर आली आहे.

लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने विरोधकांनीही सरकारवर टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही लाडकी बहिण योजनेचा हप्ता लवकरच जमा होईल असं अश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

लाडक्या बहिणीचं नियोजन केलं आहे आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने मी या निधीचं नियोजन करायला लावलं. सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं लवकरच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्या खात्यात जमा होणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें