पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकाने राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक रणनिती लक्षात घेऊन भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. हा नियम तात्काळ स्वरुपात लागू होणार असून वस्तू स्वतंत्रपणे आयात होत असतील किंवा विशेष परवानगीने जरी आयात होत असतील तरीदेखील त्यावर बंदी असणार आहे.
2 मे 2025 रोजी केंद्र सरकारने परराष्ट्र व्यापार धोरण 2023 अंतर्गत नवीन पॅरा 2.20A जाहीर करत ही बंदी लागू केली आहे.पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या, किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सार्वजनिक धोरणाच्या हिताच्या दृष्टीने लागू करण्यात आली असून, याला अपवाद हवा असल्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.
एफटीपी तरतुदीमध्ये असे म्हटले आहे की पाकिस्तानातून येणाऱ्या किंवा निर्यात केलेल्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक केलेली असो किंवा परवानगी करुन आयात करण्यात येत असेल तर पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ प्रतिबंधित असेल.
भारतासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद झाल्यामुळे परकीय चलन साठ्यावरील दबाव आणखी वाढेल. एफएटीएफ सारख्या संघटनांच्या तपासणीत असलेल्या पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का बसेल. 2019 च्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेवर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला होता. हे नवीन पाऊल त्याच धोरणाचाच एक भाग आहे. यापूर्वी, भारताने वाघा-अटारी सीमा बंद केली होती, सिंधू पाणी करार स्थगित केला होता आणि पाकिस्तानी व्हिसा देखील रद्द केला होता.
