आपला प्रामाणिकपणा आणि धाडसीपणासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका आज अखेर निवृत्त दिले आहेत. आपल्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 57 वेळा बदली झाली होती. रॉबर्ट वाड्रा जमीन व्यवहारात त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. 1991 च्या बॅचचे अधिकारी अशोक खेमका हरियाणाच्या वाहतूक विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. ही त्यांची अखेरची बदली ठरली. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला होता.
हरियाणा-कॅडर अधिकारी असलेल्या खेमका 2012 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित गुरुग्राम जमीन व्यवहारातील उत्परिवर्तन रद्द केल्यानंतर चर्चेत आले होते. उत्परिवर्तन हे जमीन मालकी हस्तांतरण प्रक्रियेतील एक महत्त्वाचं पाऊल आहे. अशोक खेमका यांच्या कारकिर्दीत अनेक बदल्या झाल्या. तब्बल 57 म्हणजे सरासरी दर सहा महिन्यांनी एकवेळा त्यांची बदली झाली. हरियाणातील कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याची झालेली ही सर्वाधिक बदली आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात ते वाहतूक विभागात परतले होते. हा विभाग अनिल वीज यांच्या अंतर्गत आहे. मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये वाहतूक आयुक्तपदी होते. यानंतर तब्बल दशकभरानंतर ते वाहतूक विभागात नियुक्त झाले होते. याआधी त्यांची बदली झाली तेव्हा फक्त 4 महिन्यांसाठी ते या पदावर होते.
गेल्या 12 वर्षात अशोक खेमका यांना पर्यायाने कमी महत्त्वाची पदं देण्यात आली होती. त्यांना चार वेळा Archives म्हणजेच अभिलेखागार विभागात नेमण्यात आलं होतं. 2013 मध्ये एकदा काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकाळात तीन वेळा त्यांची या विभागात महासंचालक आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
2023 मध्ये अशोक खेमका यांनी मनोहरलाल खट्टर यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची इच्छा व्यक्त करत राज्य दक्षता विभागाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 23 जानेवारी 2023 रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी नोकरशाहीतील कामाच्या एकांगी वाटपावर टीका केली. अधिकाऱ्यांवर खूप ताण असून त्यांच्यासह इतरांना अभिलेखागारासारख्या विभागात फारसे काम करायचे नाही.
“कामाचे एकंगी वाटप सार्वजनिक हिताचं काम करत नाही. माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात भ्रष्टाचार समूळ नष्ट दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून मी काम करु इच्छित आहे. जर संधी मिळाली तर मी तुम्हाला खात्री देतो की भ्रष्टाचाराविरुद्ध खरा लढा देईन आणि कोणीही कितीही उच्च आणि शक्तिशाली असला तरी त्याला सोडले जाणार नाही,” असं त्यांनी लिहिलं होतं.
दोन वर्षांपूर्वी, आयएएस अधिकाऱ्यांचं प्रमोशन झाल्यानंतर अशोक खेमका यांनी ट्विट केलं होतं की, “भारत सरकारमध्ये सचिव म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या माझ्या बॅचमेट्सचे अभिनंदन! हा आनंदाचा प्रसंग असला तरी, स्वतःला मागे सोडल्याबद्दल तेवढीच निराशा आणते.”
“सरळ झाडे नेहमीच आधी कापली जातात. कोणताही पश्चात्ताप नाही. नव्याने संकल्प करून, मी टिकून राहीन”, असा निर्धारही त्यांनी केला होता.
1965 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या खेमका यांनी आयआयटी खरगपूरमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (1988), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) मधून संगणक विज्ञानात पीएचडी आणि व्यवसाय प्रशासन आणि वित्त या विषयात एमबीए केलं आहे. कर्तव्य बजावताना त्यांनी पंजाब विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षणही घेतलं.
