Search
Close this search box.

मुख्यमंत्र्यांच्या लेकीला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश, आईनेच सांगितले किती टक्के मार्क्स मिळाले..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिेशनने (CISCE) आज 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ICSE दहावीचा निकाल जाहीर केला. बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट (cisce.org.) किंवा (results.cisce.org) ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेकीने या बोर्डातून दहावीची परीक्षा दिली होती. तिचा निकालही समोर आलाय. अमृता फडणवीसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लेक दिवीजाच्या दहावी निकालाची गुड न्यूज शेअर केलीय.

दहावीचा निकाल 99.09%

सीआयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 99.09 इतकी नोंदवली गेली आहे. आयसीएसई दहावीत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.37%  असल्याने मुलींचे सगळीकडून कौतुक होताना दिसतंय. त्याचवेळी मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 98.84% इतका आहे. यावर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च दरम्यान झाल्या होत्या. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता निकाल जाहीर झालाय.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना  अक्षय तृतीयेनिमित्त शुभेच्छा दिल्या. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा करत गृहप्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी घडल्याचे त्यांनी सांगितले. ‘आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय. कारण आमची सुकन्या दिविजा ही दहावीच्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.’, असे अमृता म्हणाल्या.

CISCE ICSE 10th Result 2025: कसा पाहू शकता निकाल?

प्रथम उमेदवारांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला (cisce.org.) वर जा. त्यानंतर निकाल तपासण्यासाठी उपलब्ध लिंकवर क्लिक करा.तुमचा रोल नंबर एंटर करा आणि सबमिट करा. तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल.विद्यार्थी निकाल तपासल्यानंतर तो डाउनलोड देखील करू शकतात.

डिजीलॉकरवर तुमचा निकाल कसा तपासायचा?

डिजीलॉकरवर आयसीएसई, आयएससी निकाल तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. DigiLocker वेबसाइट (digilocker.gov.in.) वर जा किंवा अॅप डाउनलोड करा. तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमचे डिजीलॉकर खाते तयार करा. तुमच्या ओळखपत्रांसह लॉगिन करा. मार्कशीटवर क्लिक करा आणि बोर्ड निवडा. रोल नंबर एंटर करा आणि उत्तीर्ण वर्ष निवडा. आयसीएसई, आयएससीच्या गुणांची माहिती स्क्रीनवर दिसेल.

admin
Author: admin

और पढ़ें