जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारनं अतिशय कठोर पावलं उचलत पाकिस्तानला धडा शिकवण्यास सुरूवात केली असतानाच पाकिस्तानचा कांगावासुद्धा समोर आला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरूय. काश्मीर खोऱ्यात 1500 हून अधिक ओजीडब्ल्यू आणि दहशतवादाशी संबंधित असलेल्या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. एनआयए, आयबी, सीआयडी आणि आर्मी आयडब्ल्यू या सर्व गुप्तचर शाखा बैसरन हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी आणि दहशतवाद्यांची ओळख पटविण्यासाठी पुरावे गोळा करतायत. देशातील या महत्त्वाच्या घडामोडीसमवेत राज्यातही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याचसंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर
दुर्गम भागात दौऱ्यावर असल्याने थेट बैठकीला उपस्थित राहणं शक्य नाही म्हणून ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी – अरविंद सावंत
पहलगाममधील निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून देशावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय दुःखाच्या काळात आणि एकजुटीच्या काळात आम्ही आमचा पाठिंबा दिलाय हे स्पष्ट केल होत
सरकारने सर्वपक्षीय बैठकीसाठी सभागृहातील नेत्यांना आमंत्रित केले आहे, तर संजय राऊत आणि मी दोघेही आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात अधिकृत संसदीय स्थायी समितीच्या शिष्टमंडळात आहोत
मी असलेल ठिकाण इतकी दुर्गम आहेत की आपण वेळेवर नवी दिल्लीत पोहोचू शकत नाही आणि फक्त सभागृहातील नेत्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे
तरीही चर्चा आणि ब्रीफिंगमध्ये सामील होण्याची कोणतीही संधी मिळाल्यास आम्ही उपस्थित राहू. सरकारने आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लाईनद्वारे सामील होण्याची परवानगी दिली तर आम्ही बैठकीला उपस्थित राहू
गुप्तचर यंत्रणेच्या अपयशांबद्दल आणि हा हल्ला का आणि कसा झाला याबद्दल प्रश्न उपस्थित होतील, आता ती वेळ नाही परंतु आपल्या देशावर झालेल्या या क्रूर आणि भ्याड हल्ल्याला सरकारने दिलेल्या कोणत्याही कडक प्रत्युत्तराला आमचा पाठिंबा आहे
आज आपण एकजूट आहोत आणि आम्हाला आशा आहे की, संपूर्ण देशाच्या वतीने सरकार दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना क्रूर आणि कडक उत्तर देईल की ते पुन्हा कधीही आपल्या कोणत्याही नागरिकाला स्पर्श करण्याचा विचार करणार नाहीत
पाकिस्तानला धडकी! भारतासाठी एअरस्पेस केली बंद
भारताच्या ऍक्शनवर पाकिस्तान बिथरलं
पाकिस्तानने भारतासोबतचे व्यवहार केले बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी अपडेट
