Search
Close this search box.

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने उघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे…; रेल्वे मंत्र्यांची माहितीउघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे…; रेल्वे मंत्र्यांची माहिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबईमधील बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकार मुंबईमधील लोकल ट्रेनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. यावेळेस रेल्वेमंत्र्यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी भविष्यात काय नियोजन करण्यात आलं आहे याबद्दलची माहिती दिली.

सुसह्य होणार लोकल प्रवास

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुसह्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. तसेच येत्या काळात मुंबई लोकलच्या अधिक फेऱ्या चालवण्याच्या दृष्टीने कामे सुरू असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.

300 किमीचं नवं नेटवर्क

मुंबई उपनगरीय सेवांच्या वाढीसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी रेल्वेचे सुमारे 17 हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये 300 किलोमीटरहून अधिक नवीन मार्गाचा समावेश असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. नव्या मार्गांमध्ये कुर्ला- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाचवी आणि सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी तसेच सहावी मार्गिका, हार्बर मार्गाचे गोरेगाव ते बोरिवली एक्सटेन्शन, बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका, पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर अशा विविध नवीन मार्गिका उभारण्याचे काम सुरू असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी नमूद केलं.

नवी सिग्नल यंत्रणा

उपनगरी रेल्वे सेवांच्या 30 टक्के अधिक फेऱ्या चालवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत आहे. कम्युनिकेशन ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टीम (सीबीटीसी) समावेश असलेली कवच 5.0 ही मुंबई केंद्रित सिग्नल प्रणाली डिसेंबरपर्यंत विकसित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सेवांमध्ये वाढ करण्यास मदत होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

नव्या एसी लोकल

येत्या काळात मुंबई लोकलच्या ताफ्यात 238 नवीन एसी लोकल दाखल करण्यात येणार असून, त्यांच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या खास डिझाइन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

कोकण रेल्वेसंदर्भात मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी, “कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्याची विनंती केंद्र शासनाला केली आहे,” असं सांगितलं.

admin
Author: admin

और पढ़ें