मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अबू सालेमने मोठा दावा केलाय. 25 वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च 2025 अखेरीस संपुष्टात आल्याचा दावा सालेमनं केलाय.. उच्च न्यायालयात प्रत्यार्पण काराराचा दाखला देऊन सालेमनं जेलमधून सुटकेची मागणी केलीय… सालेमच्या दाव्याची दखल घेऊन न्यायालयाने त्यावर केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
तहव्वूर राणाची 10 वाजता चौकशी सुरू होणार
–NIA करणार तहव्वूर राणाची चौकशी
–सीसीटीव्हीसमोर होणार राणाची चौकशी
–चौकशीचं रेकॉर्डिंगही होणार
– पटियाला कोर्टानं तहव्वूर राणाला 18 दिवसाची NIA कोठडी सुनावली
– त्यानंतर आता NIA राणाची चौकशी करणार आहे
– त्याच्या चौकशीतून मुंबई हल्ल्याचं सत्य समोर येणार आहे..
पाहुया आज लक्ष वेधून घेणा-या तीन महत्त्वाच्या बातम्या
पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे तहव्वूर राणाची….. 26/11 मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसाची NIA कोठडी सुनावण्यात आलीय.. पतियाला कोर्टानं त्याला कोठडी सुनावलीय.. आज त्याची चौकशी केली जाणार आहे.. त्यामुळे त्याच्या चौकशीतून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं सत्य समोर येणार आहे..
दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती प्रशांत कोरकटर आज तुरुंगाबाहेर येणार आहे.. जामिनासाठीची प्रक्रिया आज पार पडणार आहे.. त्यानंतर कोल्हापुरातील कळंबा तुरुंगातून तो बाहेर येणार आहे.. .
तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणाची.. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेची हत्या करणा-या आरोपीला आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे.. बिद्रेची पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर आणि त्याच्या सहकार्यानं हत्या केली होती.. पनवेल कोर्ट आरोपीला काय शिक्षा देणार याकडे लक्ष लागलंय..
