सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाली होती. मात्र मंगळवारीदेखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताच बदल झाला नाहीये. सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 4,5 आणि 7 एप्रिल रोजीदेखील घसरल्या होत्या. त्यामुळं तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आज काय आहेत सोन्याचे दर
आज 8 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 600 रुपयांनी घसरून 82,400 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं 22 कॅरेट प्रति 100 ग्रॅमचा दर 6000 रुपयांनी घसरून 8,24,000 रुपयांवर पोहोचला आहे. 7 एप्रिल रोजीदेखील सोन्याचा दर घसरून 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमने 83,000 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेटचा एक ग्रॅमचा भाव 8,225 रुपये इतका आहे.
24 आणि 18 कॅरेटचा दर किती
24 कॅरेटचा दर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 89730रुपयांवर आहे. त्या व्यतिरिक्त 24 कॅरेट प्रति 1 ग्रॅम गोल्डचा भाव 8973 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेटचा दर 10 ग्रॅम सोन्याची दर 490 रुपयांनी कोसळून 67,420 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 1 ग्रॅम सोन्याची किंमत 6730 रुपये आहे.
चांदीचे दर किती आहेत
आज चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशीही कोणतेही बदल झालेले नाहीत. 8 एप्रिल रोजी 10 ग्रॅम चांदीची किंमत 940 रुपयांवर पोहोचली आहे. त्या व्यतिरिक्त 100 ग्रॅम चांदीचा भाव आज 9400 रुपये आहे. 1 किलो चांदीचा भाव 94,000 रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काय आहे दर
आज 8 एप्रिल रोजी कॉमेक्सवर 1.22 टक्क्यांनी वाढून 3,009.50 अमेरिकी डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा दर 1.59 च्या तेजीसह 30.075 अमेरिकन डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहेत. सोन्याच्या किंमतीत 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. टॅरिफमध्ये झालेल्या बदलांनतर मंदीचे सावट पसरले आहे
