केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) दोन टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या वाढीसह, आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांचा महागाई मदत (DR) 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढेल. सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत ही वाढ करण्यात आली आहे.
याआधी 2024 मध्ये अखेरची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता 50 टक्क्यांवरुन 53 टक्के करण्यात आला होता. आता त्यात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत 2 टक्के महागाई भत्ता जोडला जाईल. 1 जानेवारी 2025 पासून ही वाढ प्रभावित ठरवली जाईल. महागाई भत्त्यात वाढ केल्याने करोडी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे.
पगार किती वाढणार?
– जर एखाद्याचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल, तर 53% महागाई भत्तानुसार त्याला 26 हजार रुपये महागाई भत्ता मिळेल. तर 55% महागाई भत्ता नुसार त्याला 27 हजार 500 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 1 हाजर रुपयांची वाढ होईल.
– सध्या, 70 हजारांच्या मूळ पगारावर, महागाई भत्ता 37 हजार 100 रुपये असेल. परंतु 55 टक्के महागाई भत्त्यानुसार, महागाई भत्ता 38 हजार 500 रुपये असेल. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात 1400 ने वाढ होईल.
– त्याचप्रमाणे, ज्यांचे मूळ वेतन 1 लाख रुपये आहे त्यांना 53 टक्के महागाई भत्ता म्हणून 53 हाजर रुपये मिळत होते, परंतु आता त्यांना 55 टक्क्यांनुसार 55 हजार रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2000 रुपयांची वाढ होईल.
78 महिन्यात पहिल्यांदाच
मागील काही वर्षांमध्ये महागाई भत्ता 3 ते 4 टक्क्यांनी वाढत होता. पण गेल्या 78 महिन्यात म्हणजेच 6.6 वर्षात पहिल्यांदा डीएमध्ये फक्त 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याआधी 2018 मध्ये 2 टक्के वाढ झाली होती. त्याआधी सलग 3 ते 4 टक्के वाढ होत होती.
2 महिन्याचे एरिअर मिळणार
सरकारने मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, दोन महिन्यांची थकबाकी एकत्रित करून मार्च महिन्याच्या पगारासह दिली जाईल. जानेवारी आणि फेब्रुवारीसह, मार्च महिन्याचा महागाई भत्ता देखील पगारात जोडला जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवला जाईल. जर कोणत्याही केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार 19 हजार रुपये असेल तर त्याला महागाई भत्ता म्हणून 10 हजार 70 रुपये मिळतील. आता 2 टक्के वाढीनंतर हा भत्ता 10 हजार 450 रुपये झाला आहे.
