मुंबईमधील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच कॉर्परेटमध्ये काम करणाऱ्यांनी तुफान गर्दी केल्याचं दिसून येत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम) प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. दीड वर्षापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा (आयआयएम) दर्जा मिळालेल्या संस्थेत आता प्रवेशासाठी अभूतपूर्वी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. एमबीएसाठी या संस्थेत 540 जागा उपलब्ध आहेत. मात्र या 540 जागांसाठी तब्बल 5 लाख 59 हजार 887 अर्ज प्राप्त झाले आहेत.
मागील वर्षी होते अवघ्या 13 हजार 534 अर्ज
पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (नीती) या संस्थेला दीड वर्षांपूर्वी आयआयएमचा दर्जा मिळाला. त्यामुळे संस्थेत प्रवेशासाठी गर्दी झाली आहे. गेल्यावर्षी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या अवधी 13 हजार 534 होती. केवळ आयआयएमचा दर्जा मिळाल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी उड्या मारल्याचे चित्र आहे.