Search
Close this search box.

Prashant Koratkar Arrest: प्रशांत कोरटकरला अखेर अटक, तेलंगणातून ठोकल्या बेड्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलंगणामधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलीस लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहेत. न्यायालयाने प्रशांत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता.

प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी ठेवली आहे.  तोपर्यंत न्यायालयाने अटकेपासून संरक्षणही दिलं नव्हतं. त्यामुळे प्रशांत कोरटकर हा परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्यानंतर कोलकाता विमानतळावरुन तो दुबईला पळून गेल्याचा संशय होता.

प्रशांत कोरटकर देशाबाहेर पळून जाईल त्यामुळे पोलिसांनी कोरटकरचा पासपोर्ट जप्त करावा असा अर्ज इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या वकिलांनी केला होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घेतला होता. प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला होता. यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली होती.

कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यादरम्यान याचिकेची प्रत उपलब्ध नसल्याने कोर्टाने सोमवारी सुनावणी ठेवली.

admin
Author: admin

और पढ़ें