बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाता मोठा ट्विस्ट आला आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावर दीडशे जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या होत्या? कशा पद्धतीची ही हत्यारं होती? याची कल्पनाचित्र CIDनं रेखाटली आहेत. या प्रकरणातील आरोपपत्रात या कल्पनाचित्रांचा समावेश करण्यात आला असून ती कोर्टात सादर करण्यात आली. यामध्ये गॅसचा पाईप वळवून त्याची मूठ तयार केली होती. तर लोखंडी पाईपला क्लच वायर लावली होती. ऊसतोड मुकादमांचं अपहरण करून त्यांनाही याच हत्यारांनी मारहाण केली जात होती असा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीचा कोर्टात अर्ज दाखल केला आहे. प्रकरणाची सुनावणी बीड कोर्टात करण्याची विनंती करण्यात आली आहे. खंडणी,हत्या, अॅट्रॉसिटी प्रकरणाची सुनावणी एकत्र घेण्याबाबतही अर्ज करण्यात आला आहे. बीड कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 मार्च रोजी देशमुख हत्या प्रकरणात पहिली सुनावणी होणार आहे आहे.
वैभवी देशमुखचा जबाब झी २४तासच्या हाती आला आहे. ‘पप्पांनी मला सांगितलं, बेटा विष्णू चाटेचा फोन आलाय’. ‘माझे काही बरेवाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे’ असं वैभवीने जबाबात सांगितले आहे.
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 88 दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना काही सापडत नाही. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाही.
