Search
Close this search box.

भारत – पाक सामन्यात प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल… कॅप्टन रोहित ‘या’ गोलंदाजांना देणार संधी?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. यांच्या व्यतिरिक्त ग्रुप ए मध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव झाला. तर 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेश विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला.

 

भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील दुसरा सामना एकमेकांविरुद्ध रविवारी खेळणार आहेत. यात पाकिस्तानचा पराभव झाल्यास ते चॅम्पियन्स ट्रॉफीतून थेट बाहेर पडतील. तर भारताचा विजय झाल्यास ते सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत भारत – पाकिस्तान हे दोन संघ 5 वेळा आमने-सामने आले आहेत.  यापैकी 3 वेळा भारताने तर 2 वेळा पाकिस्तानने विजय मिळवलाय.

पाकिस्तानचा सलामी फलंदाज फखर जमां हा न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो फलंदाजीसाठी सुद्धा उतरला नाही. या दुखापतीमुळेच फखर जमां हा भारताविरुद्ध दुबईत होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती आहे. त्याऐवजी इमाम उल हक याचा पाकिस्तानच्या संघात समावेश केला जाईल.

बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपने चांगलं परफॉर्म केलं होतं. त्यामुळे तेथे बदल होण्याची शक्यता कमी आहे. रोहित शर्मा प्लेईंग 11 निवडताना गोलंदाजीत बदल करू शकतो. पाकिस्तानच्या विरुद्ध कुलदीप यादवच्या ऐवजी वरुण चक्रवर्ती याला प्लेईंग 11 मध्ये निवडले जाऊ शकते. तर हर्षित राणा आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश असेल.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत भारत – पाकिस्तान हे दोन संघ 5 वेळा आमने-सामने आले आहेत.  यापैकी 3 वेळा भारताने तर 2 वेळा पाकिस्तानने विजय मिळवलाय. 19 सप्टेंबर 2004 रोजी झालेल्या सामन्यात 3 विकेट्सने पाकिस्तानचा विजय झाला होता. तर 26 सप्टेंबर 2009 रोजी झालेल्या सामन्यात 54 धावांनी पाकने भारतावर विजय मिळवला होता. तर 2017 रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये सुद्धा पाकिस्तानने भारतावर विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. तर भारताने 15 जून  2013 रोजी पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. तर 14 जून रोजी झालेल्या सामन्यात भारताने 124 धावांनी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता.

admin
Author: admin

और पढ़ें