किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीला फुलांनी सजवण्यात आलं होतं.
किल्ले शिवनेरीवर शिवजयंती निमित्त शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांना नमक केलं.
शिवजयंतीच्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते, तसेच, अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
यावेळी अनेक साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. शिवनेरीवर लहान लहान मुलांनी या साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करुन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
जिथे शिवरायांचा जन्म झाला तिथे अत्यंत दिमाखात आणि पारंपारिक पद्धतीने त्यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आला. त्यानंतर महिलांनी याचं नाव ठेवलं शिवाजी, शिवाजी, शिवाजी… असं सांगितलं. तिनही नेत्यांच्या उपस्थितीत शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात आला.
शिवजन्मोत्सवावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. यावेळी संपूर्ण परिसर हा शिवरायांच्याा नावाने दुमदुमला.
