Search
Close this search box.

HSC Board Exam : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवार 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुंबई विभागातून नियमित 325571 विद्यार्थ्यांसह एकूण 342012 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल विज्ञान शाखेचे 1 लाख 27704 विद्यार्थी आणि कला शाखेचे 47879 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मुंबईतून 1 लाख 26 हजार 630 विद्यार्थी परीक्षेला बसले असून ठाणे जिल्ह्यातून 1 लाख 15 हजार 484, रायगडमधून 35 हजार 987 आणि पालघर जिल्ह्यातून 63 हजार 220 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्याल?

विद्यार्थ्यांना आता हॉल तिकिटासोबतच महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

वाहतूक कोंडीचा विचार करता पालक आणि विद्यार्थ्यांनी थोडं आधीच घरातून निघावं.

आपल्याला ज्या कपड्यांमध्ये मोकळं ढाकळं वाटेल असेच कपडे परिधान करा.

पुरेसा नाश्ता करुन जाणे आवश्यक आहे पण जास्त जड पदार्थ खावू नका.

11 ही वेळ पेपरची योग्य आहे अशा वेळी विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष केंद्रीत कसे राहिल याची काळजी घ्या.

मानसिक आणि शारीरिक ताण येईल अशा कोणत्याच गोष्टी करु नका.

परीक्षेला जाताना पाण्याची बाटली आणि पेन महत्त्वाचे इतर साहित्य आवर्जून घ्यावे.

पालकांनी काय करावं? 

पालकांनी विद्यार्थ्यांवर पेपरला जाण्यापूर्वी कोणत्याच प्रकारची चिडचिड किंवा घाई करु नये.

मुलांना त्यांचा असा थोडा वेळ द्यावा.

तसेच या परीक्षेच्या काळात पालकांनी विशेष काळजी घ्यावी. हलका आहार द्यावा.

फार ताण होणार नाही असं वातावरण घरी नसावं. हलकं आणि अतिशय आनंदी वातावरण ठेवावे.

विद्यार्थी पेपर देऊ आल्यावर पेपर कसा गेला? कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं असं विचारु नये? त्यांना त्यांचा असा वेळ द्यावा.

admin
Author: admin

और पढ़ें