रविवारी वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने इंग्लंड संघाचा 150 धावांनी पराभव करत धुव्वा उडवला. भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामान्यांची टी 20 सिरीज खेळवली गेली असून यातील पाचवा सामना काल मुंबईत पार पडला. यात टीम इंडियाने पहिल्या डावात तुफान फटकेबाजी करून 247 धावा केल्या आणि विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला 97 धावांवर रोखले. यादरम्यान फलंदाजीत शतकीय कामगिरी करून युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा याने ऐतिहासिक खेळी केली आणि ख्रिस गेलचा रेकॉर्ड धुळीस मिळवला.
अभिषेक शर्माचं वादळी शतक :
युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाचव्या टी 20 सामन्यात तुफान फलंदाजी करून इतिहास रचला. अभिषेक हा भारताकडून टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. यासोबत अभिषेक हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंड विरुद्ध सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 37 बॉलमध्ये शतक पूर्ण केले. असं करून अभिषेक शर्माने एरोन फिंच आणि क्रिस गेल यांचा रेकॉर्ड धुळीस मिळवला. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एरोन फिंच आणि क्रिस गेल यांनी 47 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. पण अभिषेकने यांच्यापेक्षा 10 बॉल कमी खेळून शतक लगावले. परंतु अभिषेक शर्मा रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्यापासून थोडक्यात राहिला. भारताकडून सर्वात जलद टी 20 शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्मा याने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.
इंग्लंड विरुद्ध सर्वात जलद टी 20 शतक ठोकणारे फलंदाज :
अभिषेक शर्मा- 35 बॉल (2025)
एरोन फिंट- 47 बॉल (2013)
क्रिस गेल- 47 बॉल (2016)
सूर्यकुमार यादव- 48 बॉल (2022)
रोवमॅन पॉवेल- 51 बॉल (2022)
भारतीय संघाची प्लेईंग 11:
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड संघाची प्लेईंग 11:
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड
