Search
Close this search box.

‘हत्या, राख, खंडणी, मटका…’, DPDC बैठकीत अजित पवारांसमोरच मुंडे, धस आणि सोनावणे यांच्यात बाचाबाची, ‘बीडची बदनामी…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली असून, यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde), सुरेश धस (Suresh Dhas) आणि खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavne) आमने-सामने आले आहेत. बीडची बदनामी आणि अधिकाऱ्यांवर दहशत असल्याच्या आरोपांवरुन तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी धनंजय मुंडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुरेश धस, बजरंग सोनावणे होते. बैठकीनंतर बजरंग सोनावणे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

डीपीडीसीच्या बैठकीत गैरव्यवहाराची सीडी, पेन ड्राईव्ह यांचा मुद्दा उपस्थित झाला का? असं विचारलं असता त्यांनी नाही असं म्हटलं, पुढे ते म्हणाले, ‘पण जर कोणीला एकाला बाजूला करुन बोललं तर आम्ही पाहत राहणार नाही. दहशत कोणाची याचं उत्तर द्या सांगितलं. माजी पालकमंत्री म्हणाले इथे अधिकाऱ्यावर दहशत आहे. मग कोणाची दहशत आहे विचारल्यावर त्यावर बाचाबाची झाली. यानंतर बैठक संपली”. अजित पवार बैठक सोडून निघून गेल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

“वेगवेगळ्या पद्दतीने माडंलं असता आम्ही एका बाजूने आण ते दुसऱ्या बाजून बोलत होते. अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडची बदनामी करु नका सांगत होते. आम्ही बदनामी करतोय का?मर्डर, चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी, मटका चालवतोय का? सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचं काम करत आहोत. संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागत आहोत, ही बदनामी आहे का? यावरुन बाचाबाची झाली,” अशी माहिती बजरंग सोनावणे यांनी दिली.

“बीडमधील प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीने झाल्या आहेत. एक तर सीओनी कोणताही आराखडा मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या आहेत. दोन तीन महिन्यानंतर आम्हाला मागितलेली माहिती देण्यात आली. सोलापूर – जालना रेल्वे होण्यासाठी नवा ठराव डीपीडीसीचा मंजूर करण्यास सांगितला. त्याला सर्व सभागृहाने मान्यता दिली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“विमानतळाची मागणी सभागृहात केली तेव्हा सगळे मला हसले. या चार वर्षात बीडमध्ये विमानतळ करणारच. अजित पवारांनीही मी पैसे देतो, प्रस्ताव तयार करा असं सांगितलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

admin
Author: admin

और पढ़ें