भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 T-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोट येथे खेळवला जाणार आहे. भारतीय टीम विजय मिळवून कोलकाता आणि चेन्नईमध्ये मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आज टीम इंडियाची नजर 3-0 अशी आघाडी मिळवण्यावर आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये काही बदल करू शकतो अशी चर्चा आहे. त्याचमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आज संघात स्थान मिळणार की नाही याच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. नोव्हेंबर 2023 नंतर तो संघात परतला पण पहिल्या दोन T-20 सामन्यांमध्ये तो मैदानात उतरू शकला नाही. आता या सामन्यात तो खेळू शकतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
‘हा’ खेळाडू होऊ शकतो बाद
चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये, भारताने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आणि तिसऱ्या सामन्यासाठी देखील भारत पुन्हा दोन बदल करण्याची शक्यता आहे. शेवटच्या सामन्यात उत्तम न खेळलेला विकेटकीपर आणि फलंदाज ध्रुव जुरेल फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही. याच कारणामुळे तो कदाचित संघ बाहेर जाऊ शकतो. त्याच्या जागी शिवम दुबे किंवा रमणदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. या आधी शनिवारी, नितीश कुमार रेड्डी संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शिवम दुबे आणि रमणदीप सिंग यांचा संघात समावेश करण्यात आला. शिवाय पाठदुखीमुळे रिंकू सिंगला दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 मधून वगळण्यात आले.
संभाव्य प्लेइंग -11
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) .
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार) , हॅरी ब्रूक (उपकर्णधार) , फिल सॉल्ट (विकेटकीपर), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.
भारत विरुद्ध इंग्लंड कुठे बघता येईल लाइव्ह मॅच
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा T20I स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. हा सामना Disney+ Hotstar वर थेट प्रवाहासाठी देखील उपलब्ध असेल.
