नाराजी दाखवून आपल्या पदरात काही मिळेल का, हा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे (Eknath Shinde) यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे. किंबहुना उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल, ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे. असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावाला रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस ते दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत टीका केली आहे.
“भांडा सौख्यभरे” असे म्हणण्याची वेळ आलीय-विजय वडेट्टीवार
सध्याची ही सगळी परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देईल. हा काय सावळा गोंधळ, ड्रामा सुरू आहे. एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले, सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. शर्मेने मान खाली घालावी, अशी स्पर्धा सुरू आहे. परिणामी “भांडा सौख्यभरे” असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज पालकमंत्री बदलायची पाळी आली, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.. त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल. असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हिंदू-मुस्लिम मताची पोळी शेकून सत्तेची मजा- विजय वडेट्टीवार
किरीट सोमय्या यांना आव्हान आहे की, अब्दुल सत्तार मंत्री असताना तुमच्या मुखातून बांगलादेशी बद्दल शब्द का आले नाही. आता मंत्रिमंडळातून ते बाहेर पडताच ते का दिसत आहे. त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं. ज्यांच्याकडे साडेसात वर्षापासून गृहमंत्री पद आहे. तुम्ही का थांबवलं नाही? त्यांना मात्र पदापासून दूर केल्यानंतर भाजपकडून नवीन नवीन विषय उघडले जात आहे. मतांचे पोलोरायझेशन करण्यासाठी मंदिर के नीचे मस्जिद धुंडेगे. नितेश राणे कोकणातल्या जमिनीवर बोलले. हिंदू मुस्लिम मताची पोळी शेकून सत्तेचा मजा करत आहे. अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी किरीट सोमय्या यांच्या सिल्लोड दौऱ्यावरुन केली. असेही
लाडक्या बहिणी याचा बदला घेईल- विजय वडेट्टीवार
लाडक्या बहिणीचं काम झालं, लाडक्या भावानी दाबून खाणे सुरू केलंय. त्यामुळे या बहिणीचा त्यांना श्राप लागले, हळू हळू लाभार्थी कमी होईल, बहीण त्याचा बदला घेईल. किंबहुना शेतकरी कर्जमाफी कधी होणार? तिघांचा भांडनात महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे. अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केलीय.