उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच महाराष्ट्रातील एका नेत्याचं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं निधन झालं असून त्यांचा मृतदेह प्रयागराज येथून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे.
महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळासाठी गेले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शरद पवार यांच्या विश्वासातील नेते म्हणून महेश कोठे यांची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…
