देश

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीत जवळपास 56 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

निलकमल असे दुर्घटनाग्रस्थ या बोटीचे नाव आहे. दोन बोटींचा एकमेकींना धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नौदलाच्या 11 बोटी, सागरी पोलिसांच्या 3 बोटी आणि तटरक्षक दलाच्या एका बोटी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बोटींसह चार हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरु आहे. या बोटीची क्षमता फक्त 84 प्रवासी नेण्याची होती. या बोटीतून 80 प्रवासी प्रवास करत होते. नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Related Articles

Back to top button