देश

भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात; अंबानी यांची कोकणात 10000 कोटींची गुंतवणूक

रतीय उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) कोकणात 10000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड (Reliance Defence Limited) रत्नागिरीमध्ये स्फोटके (Explosives), दारुगोळा (Ammunition) आणि लहान शस्त्रे तयार (Small Arms) करणारा प्लांट उभारणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा नवीन प्रकल्प मानला जात आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प पाकिस्तानसाठीही धडकी भरवणारा आहे.

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने महाराष्ट्रातील या मोठा डिफेन्स प्रोजेक्टची घोषणा केली आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसबसिडरी कंपनी आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी कोकणात धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारणार आहे. या प्रक्लपासाठी रत्नागिरीतील वाटड औद्योगिक परिसरात 1000 एकर जमीन देण्यात आली आहे. येथेच धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी (DADC) मध्येच रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी उभारली जाणार आहे. या कंपनीत स्फोटके, दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार केली जाणार आहेत.

या कंपनीमार्फत दारुगोळा श्रेणीत लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनली गायडेड म्यूनिशन (Terminally Guided Munition) यांची निर्मीती केली जाणार आहे. स्मॉल आर्म्स पोर्टफोलिओमध्ये सिव्हिल आणि मिलिट्री एक्सपोर्ट मार्केट्वर फोकस केला जाणार आहे. या डिफेन्स प्रोजेक्ट अंतर्गत पुढील 10 वर्षात कंपनी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह करार केला जाणार आहे.

रिलायन्स डिफेन्स लिमिटेडला याआधीच सरकारकडून शस्त्रास्त्र निर्मीतीचा परवाना मिळाला आहे. रिलायन्सचा नागपूरच्या मिहानमध्ये फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत यशस्वी संयुक्त उपक्रम सुरू आहे. Dassault Reliance Aerospace Limited (DRAL) आणि Thales Reliance Defence Systems (TRDS) या दोन कंपन्यांमार्फत शस्त्रसाम्रगीचे उत्पादन केले जाते. उत्पादनातील 100 टक्के निर्यात केली जाते. या उपकंपनीद्वारे कंपनीने 1000 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत. अनिल अंबानींची कंपनी कर्जमुक्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 350 रुपयांवर पोहोचले आहेत.

Related Articles

Back to top button