देश

लाडकी बहिण योजनेच्या अर्जासंदर्भात नवी Update: आता तिसरा हफ्ता…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजेनेचा अर्ज भरण्यासाठी मदतवाढ केली आहे. हा अर्ज सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भरण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिली गेल्याची शक्यता आहे तसेच ती वाढू देखील शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता यावायासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते.

पुणे जिल्ह्यात 18 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 14 लाख, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात 10 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरु झाली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 1500 दर महिन्याला देण्यात येतात.

तिसरा हफ्ता कधी जमा होणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. महिलांना 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला अनुक्रमे पुणे आणि नागपूरमध्ये कार्यक्रम घेऊन पैसे वितरित करण्यात आले होते. आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करुन महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे तिसरा हफ्ता 29 सप्टेंबर रोजी जमा होणार आहे.

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज भरेल आहेत. तसेच ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे देखील मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच अर्ज मिळणार आहे.

29 सप्टेंबरपूर्वी संबंधित बँकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यांची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. ज्यांनी योजनेच्या सुरवातीला अर्ज केलाय पण अद्याप लाभ मिळालेला नाही, अशा महिलांचा या यादीत समावेश आहे.

Related Articles

Back to top button