बंगळुरू हत्या प्रकरणाला नवं वळण; महालक्ष्मीचे 59 तुकडे करणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू
29 वर्षीय महालाक्ष्मीचे 59 तुकडे केलेल्या प्रकरणामुळे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जाणारं बंगलुरु हादरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महालक्ष्मी हत्याकांडाचा मुख्य आरोपी, मुक्तिकाजन प्रताप रॉयने आत्महत्या केली आहे.
बंगळुरू डीसीपी-मध्य, शेखर एच टेक्कन्नवर यांनी बुधवारी याची पुष्टी केली. रॉय यांचा मृतदेह ओडिशातून सापडला आहे. महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 50 हून अधिक तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याचा आरोप त्याच्यावर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयने पळून जात असताना गळफास लावून आत्महत्या केली.
सतत बदलत होता लोकेशन
महालक्ष्मीच्या हत्येने केवळ बंगळुरूमध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर लोकांचा रोष पाहून हत्येच्या तपासासाठी अनेक पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. कर्नाटकचे जी. परमेश्वराच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना रॉयचे ओडिशामधील ठिकाण सापडले. ते म्हणाले, ‘आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे कारण या हत्येने संपूर्ण बेंगळुरू हादरले आहे.’ या गुन्ह्यात या संशयिताचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे परमेश्वर यांनी सांगितले. रॉय सतत जागा बदलत होता.
फ्रिजमध्ये सापडले तुकडे
शनिवारी जेव्हा महालक्ष्मीची आई आणि बहीण बेंगळुरूच्या मल्लेश्वरम भागातील एका इमारतीमध्ये असलेल्या तिच्या घरी पोहोचल्या तेव्हा ही हत्या उघडकीस आली. फ्रीजमध्ये महालक्ष्मीच्या शरीराचे 50 हून अधिक तुकडे सापडले ज्यावर किडे रेंगाळत होते. सुरुवातीला पोलिसांनी दोन-तीन जणांना ताब्यात घेतले होते पण सर्व पुरावे आणि माहिती रॉय यांच्याकडेच बोट दाखवत होती.
महालक्ष्मीपासून वेगळ्या झालेल्या पतीला त्याच्या शेजारी राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय होता. कथितरित्या तो महालक्ष्मीच्याही संपर्कात होता. सर्व सुगावा मिळाल्यानंतर पोलिसांनी रॉयचा शोध सुरू केला. रॉय यांच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच राहण्याची शक्यता आहे. महालक्ष्मीची हत्या का झाली आणि त्यात इतर लोकांचाही सहभाग होता का, हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे.