देश

बुलढाणा येथील सुटाळा येथे श्रीहरी लॉन्स येथे भीषण आग#news #maharashtra #publicnews

बुलढाण्यातील खामगाव शहराजवळील मंगळ कार्यालय श्रीहरी लॉन्सला काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. लॉन्समध्ये अनेक एलपीजी सिलिंडर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीचे कारण अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समोर येत आहे. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मिळालेल्या माहितीनुसर, बुलढाण्यातील खामगाव शहराजवळ असलेल्या सुटाळा येथील श्रीहरी लॉन्सला मंगळवारी रात्री आग लागली. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे लॉन्स असल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी आग लागली, तेव्हा लॉन्समध्ये १० ते १२ एलपीजी सिलिंडर होते. यामुळे स्फोट होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अकोला येथूनही अग्निशमन दलाचे वाहने बोलविण्यात आली.

या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगीने उग्र रुप धारण केल्याचे व्हिडिओत दिसत असून अग्निशमदलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही आग इतकी भीषण आहे की, काही वेळात संपूर्ण लॉन्सला विळख्यात घेतले. या आगीत संपूर्ण लॉन्स जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Back to top button