देश

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: तब्बल 23 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनास सज्ज

10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. सर्वत्र कल्ला असणारं आणि गजबजाटाचं वातावरण, घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होणार आहे.

गणपतीबाप्पाच्या विसर्जनासाठी अर्थात अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी आता मुंबई पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनाही या प्रसंगी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 10 दिवसांनंतर बाप्पा निरोप घेणार असल्यामुळं अर्थातच अनेकांच्याच भावना दाटून आल्या आहेत, त्यामुळं पुढच्या वर्षी लवकर या… अशी प्रार्थना करत आज या बाप्पांना निरोप दिला जात आहे.

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर एकिकडे लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू असतानाच दुसरीकडे अद्यापही अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रतीक्षेत असून, त्याकरता मोठ्या प्रमाणात मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी इथं गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Related Articles

Back to top button