देश

नागपूरकरांचा प्रवास आता सुस्साट होणार, नागपूर-अमरावती महामार्गावरचा फ्लायओव्हर ठरणार गेमचेंजर

नागपूरकरांसाठी मोठी आनंदांची बातमी समोर येत आहे. नागपूर – अमरावती महामार्गावर नागपूरच्या वेशीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून आता दिलासा मिळणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विक्रमी वेळेत नागपूर जवळच्या वाडीमध्ये सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधून तयार केला आहे. आज सकाळपासून हा उड्डाणपूल टेस्टिंगच्या उद्दिष्टाने सामान्य वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला आहे.

वाडी मधील 10 नंबर नाकापासून सुरू झालेला हा उड्डाणपूल अडीच किलोमीटर लांबीचा असून या उड्डाणपुलामुळे वाडी टी-पॉइंट वर होणारी वाहतूक कोंडी आता होणार नाही. आता वाहन चालकांना उड्डाण पुलावरून थेट अमरावतीच्या दिशेने वाडी शहराच्या बाहेर निघता येणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नागपूर – अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली होती, ज्यामध्ये नागपूर आणि वाडीमध्ये एका नंतर एक दोन उड्डाणपूल बांधले जातील. दोन उड्डाणपूल आणि सिमेंट रस्त्याचा हा प्रकल्प 478 कोटी रुपयांचा होता. या प्रकल्पात वाडी मधील उड्डाणपूल विक्रमी वेळेत बांधून पूर्ण करण्यात आला आहे. आज सकाळपासून याची टेस्टिंग सुरू करण्यात आल्यामुळे सामान्य वाहन चालकांना यावर पहिल्यांदाच प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे नवीन उड्डाणपूल पाहण्यासाठी आणि त्याच्यावरून वाहन चालवण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होत आहे.

Related Articles

Back to top button