देश

आनंदाश्रमात नोटा उधळल्या, राऊतांकडून मुद्दा ‘कॅश’, पाहा Video

ठाण्यात आनंद आश्रमात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटा उधळल्या. त्यावरुन संजय राऊतांनी जोरदार टीका केली. दिघे असते तर, हंटरनं फोडून काढलं असतं, असा निशाणा राऊतांनी साधला. तर त्या पदाधिकाऱ्यांना काढून टाकणार, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

500च्या नोटा उधळल्याचा हा व्हिडीओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुरु आनंद दिघेंच्या ठाण्यातल्या आनंदाश्रमातला आहे…ढोल वादन सुरु असताना नोटा हवेत भिरकावल्या जात आहेत. गणपती विसर्जनासाठी आलेल्या ढोल पथकानं आनंदाश्रमात ढोल वादन केलं. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी निखील बुडजूडे आणि नितेश पाटोळे यांनी नोटांची बरसात केली. आनंद दिघेंच्या फोटो ओवाळूनही नोटा उधळण्यात आल्यात. या व्हिडीओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकणार असल्याचं म्हटलंय.

आनंदाश्रमातला हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झालाय. दिघे असते तर लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना हंटरनं फोडून काढलं असतं, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला. आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ, आनंद दिघेंचे पुतणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते केदार दिघेंनी ट्विट केला..आणि आता ते आनंदाश्रम राहिलं नाही, अशी टीका केदार दिघेंनी केली. ठाण्याच्या टेंभीनाक्यावरील गणपतीच्या विसर्जनावेळी आनंदाश्रमात ढोल वादनानंतर पैसे देण्याची पद्धत असल्यानं नरेश म्हस्केंनी सांगितलं. मात्र कशा पद्धतीनं बक्षिसी किंवा मानधन द्यावं, याचं भान पदाधिकाऱ्यांना राहिलं नाही.

Related Articles

Back to top button