Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली
वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय.
विसर्जन मिरवणुकी वेळी जुन्या तशाच धोकादायक पुलावरून 100 पेक्षा अधिक व्यक्ती जाणार नाहीत.
जुन्या तसंच धोकादायक पुलावर विसर्जन मिरवणूक थांबणार नाहीत.
धोकादायक पुलावर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई
जुन्या आणि धोकादायक पुलावर नृत्य करण्यास बंदी.
घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, आर्थररोड रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज
भायखळा रेल ओव्हर ब्रिज, मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, सॅडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलन्ड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
बेलासीस, मुंबई सेंट्रल स्टेशनच्या जवळ, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रीज, प्रभादेवी – कॅरोल रेल ओव्हर ब्रीज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रीज