देश

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, ‘या’ दिवशी घेणार माघार

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाच्या अधूनमधून येणाऱ्या सरी वगळता या वरुणराजानं आता विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणात मात्र पावसाच्या या सरींचं प्रमाण कमी असलं तरीही त्यांचा जोर मात्र वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार सप्टेंबरमध्येच पूर्वार्धानंतर म्हणजेच साधारण 15 सप्टेंबरनंतर मान्सून मान्सून हळुहळू मंदावताना दिसेल. पण, तूर्तास मात्र गणोशोत्सवाच्या (Ganeshotsav 2024) तयारी आणि खरेदीच्या लगबगीमध्ये हाच पाऊस विघ्न आणताना दिसणार आहे. दरम्यानच्या काळात शहरात तापमानवाढीचीही नोंद केली जाऊ शकते. हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 25 अंश सेल्सिअस इतकं असेल.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाचीच हजेरी
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस मुंबईला सरत्या पावसाच्या सरींची बरसात अनुभवता येणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरासह नजीकच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं शहराच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर आहे. वाऱ्यांनी वेग घत सध्या दिशा बदलल्यामुळं मुंबईत आता विरामानंच पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button