Search
Close this search box.

‘फडणवीसांवर एवढं प्रेम आहे तर…’, मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगेंचा तोड सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केली. प्रसाद लाड माझ्या नादी लागू नको. अशा शब्दात जरांगेंनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जरांगे नेमकं काय म्हणाले? 

मी जातीसाठी लढतो. तुम्ही काहीही करा, माझ्या नादी लागू नका. 288 पाडायचे की उभे करायचे मी ठरवणार. मराठ्यांचं रक्त असेल तर फडणवीसांना जाब विचारा. 20 जुलै रोजी उपोषणाला बसणार असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

माझं बरं-वाईट झाल्यास सरकार टिकणार नाही. 20 तारखेला ठरवणार समाजाची बैठक कधी घ्यायची. देवेंद्र फडणवीस लोक अंगावर घालू नका. मराठा खवळला तर सोडणार नाही. असा इशारा जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल

तुला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू फडणवीस यांच्या सोबत लग्न कर असा हल्लाबोल जरांगेंनी लाड यांच्यावर केला आहे. तुला पैशाची मस्ती आली असेल पण समाजापुढे पैसा मोठा नाही. असं देखील त्यांनी म्हटलं. तर तुम्ही आरोप करायचा म्हणून करू नका. अंतरवालीत या समोरा समोर बसू. तुमहाला सन्मानाने वागवू. आमचं 10 महिन्यात काय वाटोळे झाले ते सांगतो.  पण तुमहाला न्याय करावा लागेल. मी चुकलो असेल तर मला सांगा. असं जरांगे म्हणाले.

फडणवीस यांना इशारा

देवेंद्र फडणवीस तुम्ही आमच्या अंगावर लोक घालू नका, तुम्हाला सांगण्याची ही चौथी वेळ आहे. आता मराठे हाणामारी करणार नाही तूमच्याकडे निघतील तुमची गय करणार नाही. असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

admin
Author: admin

और पढ़ें