विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबरोबरच वरळीमधील हिट अँड रन प्रकरण आजही गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आजही तिव्र ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी देशातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळतोय. या आणि अशाच सर्व बातम्यांसंदर्भातील अपडेट्स आपण या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहेत. क्षणोक्षणाच्या लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आज बीडमध्ये जनजागृती रॅली होतेय. या रॅलीसाठी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झालेयत. रॅलीमध्ये तीन हजारांहून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आलेयत. सगेसोयरेंच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत. या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुण रॅलीत सहभागी झालेयत. बीड जिल्ह्याने सर्वांची हवा टाईट केली असून रॅलीला रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघणार आहे…सुभाष रोड, माळीवेस चौक, अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणाराय…त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी जाहीर सभा देखील होणाराय…रॅलीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय..
