मनोरंजन

100 खासगी प्लेन, 3 फाल्कन जेट, 2500 नामवंत पाहुणे, अनंत-राधिका यांच्या लग्नाचा खर्च किती?

आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani-Radhika Merchant Wedding) मुंबईत पार पडणार आहे. शुक्रवारी, 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्व फंक्शन शाही अंदाजात झाले आहेत. पण या लग्नासाठी मुकेश अंबानी किती रुपये खर्च करत आहेत?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी सर्व विधी झाल्या आहेत. आतापर्यंत संगीत, हळदी, साखरपुडा, ग्रँड प्री-वेडिंग सोहळा यासारखे कार्यक्रम पार पडले आहेत. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक  जस्टिन बीबर (Justin Bieber In Mumba) यानं फरफॉर्म करत उपस्थित पाहुण्यांचं मनोरंजन केले. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट विवाहबंधनात अडकणार आहेत. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वादचा कार्यक्रम आहे.  ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहे

शाही लग्नात 350 मिलियन डॉलरचा खर्च !

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी 250 पेक्षा जास्त नामंवत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलेय. पाहुण्यांना येण्या-जाण्यासाठी अंबानी कुटुंबांने तीन फाल्कन-2000 जेट रेंटवर घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येऊ शकतात, असे क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानींच्या या शाही लग्नासाठी मुकेश अंबानींनी 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2500 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.

विवाह सोहळ्यात कोण उपस्थित राहणार?

ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश  अंबानी यांनी आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

प्री-वेडिंगमध्ये 1200 पाहुण्यांची उपस्थिती –

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग फंक्शन्स झाले होते. गुजरातमधील जामनगर येथे पहिला कार्यक्रम पार पडला होता. ज्यामध्ये 1200 पाहुणे उपस्थित होते. मेटाचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि इवांका ट्रम्प यांसारखे परदेशातील श्रीमंत लोकही सहभागी झाले होते. पॉप सिंगर रिहानानेही आपला परफॉर्मन्स या कार्यक्रमात केला होता. 3 दिवस चाललेल्या या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली.

अनंत अंबानी आणि राधिका यांचे दुसरे प्री-वेडिंग इटली आणि फ्रान्स दरम्यानच्या क्रूझवर झाले. बॅकस्ट्रीट बॉईज, कॅटी पेरी आणि अँड्रिया बोसेली यांनी 800 हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

Related Articles

Back to top button