देश

‘आधी अयोध्येत गळती, आता पुरातन बाणगंगेची तोडफोड…’ तो बुल्डोझर पाहून मुंबईकरांची सटकली

पलब्ध माहितीनुसार आणि काही संदर्भांनुसार मुंबईतील पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणारा बाणगंगा तलाव, सदरील परिसर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक. पण, शहरात्या याच पुरातन वारसा स्थळाची नासधूल पालिकेच्या हलगर्जी कंत्राटदारांमुळं झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं. सोशल मीडियावर बाणगंगा तलाव परिसरातील रहिवासी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसह पुरातत्व विषयातील अभ्यासकांनी ही बाब लक्षात आणून दिली आणि आता यावरून एक नवं रणकंदन माजताना दिस आहे.  (Mumbai News )

तो बुल्ड़ोझर दिसताच मुंबईकरांच्या तळपायाची आग मस्तकात… 

पुरातन बाणगंगा तलाव परिसराच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कामं हाती घेत या कामादरम्यानच तलावाच्या पायऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची बाब समोर आली. तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून बुल्डोझरवजा एक्सकॅव्हेटर मशिन उतरवण्यात आलं आणि यातच तलावाच्या पुरातन पायऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सदर प्रकरणी तलावास हानी पोहोचवल्याप्रकरणी मलबार हिल पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली असून, पालिकेनं तातडीनं या पायऱ्यांची डागडुजी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

स्थानिक आमदार आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशांनंतर (Banganga Tank) बाणगंगा तलाव परिसरात पुनरूज्जीवन प्रकल्पाअंतर्गत काही कामं हाती घेण्यात आली. या कामांसाठी निविदा प्रक्रियेतूनच कंत्राटदारांची नेमणूकही करण्यात आली होती. ज्याअंतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी म्हणून हे यांत्रिक वाहन तलावात उतरवत असताना पायऱ्या तुटल्या. सदर घटनेची माहिती मिळताच किंबहुना हे बुल्डोझरवजा वाहन पाहूनच स्थानिकांनी संताप व्यक्त करत इथं सुरु असणारं काम तातडीनं थांबवण्याची मागणी केली.

 

पुरातन ठिकाणी झालेलं नुकसान पाहता लोढा यांनी तातडीनं डागडुजीचे निर्देश दिले आणि पायऱ्यांवरील दगड पुन्हा रचण्याचं काम हाती घेण्यात आलं, पण व्हायचं ते नुकसान होऊन गेल्यानं मुंबईकरांनी पालिकेसह कंत्राटदारावर ताशेरे ओढले.

पराभवाचा वचपा… 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीसुद्धा सोशल मीडियाच्या माधघ्यमातून बाणगंगा परिसरातीय या घटनेची निंदा केली. ‘हे कृत्य धक्कादायक असून, त्या कंत्राटदाराला तातडीनं अटक करा. प्रभू श्रीरामाशी संबंधित जागांवर झालेल्या पराभवाचा अशा प्रकारे वचपा काढला जतोय का?’ असा सवाल करत आधी राजकीय फायद्यासाठी अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, त्यामागोमाग सुरु झालेली गळती आणि आता बाणगंगा परिसरातील ही घटना… नेमकं काय सुरुये? असा संतप्त सूर ठाकरेंनी आळवला.

 

दरम्यान, फक्त आदित्य ठाकरेच नव्हे, तर शहरातील अनेक नागरिकांनी बाणगंगा भागामध्ये झालेल्या या घटनेची निंदा करत पालिकेला निशाण्यावर घेतलं आहे. शहराला मिळालेला वारसा जपण्याऐवजी हे नेमकं काय सुरुय? असा बोचरा प्रश्नच सातत्यानं उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Back to top button