देशव्यापार

1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!

जून महिन्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून सोनं पुन्हा महागले आहे. शुक्रवारी सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्यानं उसळी घेतल्याचे समोर आले आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 67,600 रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्या सोबतच सराफा बाजारात चांदीदेखील महागली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी चांदी 1800 रुपये प्रति किलोने वाढून 93500 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. तर 6 जून रोजी चांदी 91,700 रुपये इतकी होती. आंतराराष्ट्राय घडामोडीचे पडसादामुळं सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती सारखीच राहणार असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच, जून महिन्यात लग्नसराई कमी सराईचे दिवसही कमी असल्याने भारतात सोन्याच्या दागिन्यांची खरेदीही थंडावली आहे. बाजारातील ट्रेडनुसार यापुढेही किंमतींमध्ये चढ-उतार कायम राहतील, असं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

7 जून रोजी सराफा बाजारात 18 ते 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बाजार उघडताच 18 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांना वाढून प्रति 10 ग्रॅम 55 हजार 310 रुपये इतका झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 300 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 67,600 रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 330 रुपयांनी वाढून73,750 इतका झाला आहे.

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 67, 600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73,750 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 55, 310रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,760 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,342 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,531 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 54, 080 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 59,000 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 44,248 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 67, 600 रुपये
24 कॅरेट- 73, 750 रुपये
18 कॅरेट- 55, 310 रुपये

Related Articles

Back to top button