Search
Close this search box.

मुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईच्या धारावीमध्ये पहाटेच्या वेळी आग लागल्याचं समोर आलं होतं. धारावीतील एका गोदामाला ही आग लागली होती. यावेळी या आगीत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळण्यात आल्याचं समजतंय.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत जखमी झालेल्या रूग्णांवर सायन रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग जमिनीपासून ते तीन मजल्यापर्यंत लागली. ही आग लागल्यानंतर जवळच्या लाकडांमुळे ती अधिक पसरली आहे. दरम्यान यापैकी एका रूग्णाला डिस्चार्ज दिला असल्याची माहिती आहे.

admin
Author: admin

और पढ़ें