महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; उष्ण- दमट वातावरण, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस
महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल पहायला मिळणार आहेत. येत्या चार पाच दिवसात वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातारवरण राहणार आहे. तर, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वार वाहणार आहे. तसेच अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे.
हवामान खात्यातर्फे पावासासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील एक, दोन जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडणार आहे. तर, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 40 किमी प्रतितास वेगानं सोसाट्याचा वारा वाहणार आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
सामान्य रूग्णालयात सुसज्ज उष्माघात कक्ष
वाढते तापमान लक्षात घेता भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपाययोजनेच्या दृष्टीने सुसज्ज उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले. परंतु आतापर्यंत एकही रुग्ण उपचारासाठी या कक्षात भरती झालेला नाही. एसी रुम, अत्याधुनिक सुविधेसह 8 खाटांचे सुसज्ज कक्ष रुग्णालयात सुरु करण्यात आलंय. या इमारतीतील प्रभाग क्रमांक 9 आणि 13 मध्ये प्रत्येकी 4 खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे. यातील एक महिलांसाठी आणि दुसरा पुरुषांसाठी आहे.
सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गंभीर बनलं आहे. जत तालुक्यातील उटगी येथील पाण्याचा स्त्रोत आटले आहेत. उटगी येथील तलाव बरोबर विहिरीतील पाणी आटले. सकाळ पासून उटगी तलावच्या ठिकाणी 14 ते 15 टॅंकर पाणी भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज 40 टॅंकर भरणाऱ्या उटगी येथे केवळ दिवसभरात 15 ते 20 टॅंकर भरले जात आहेत. जत तालुक्यात सध्या 90 हुन अधिक टॅंकरने सुरू आहे पाणी पुरवठा. येत्या 2 दिवसात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाण्यातून आटलेले तलाव आणि विहिरी भरून घेतल्या जाणार असल्याचे जत प्रांतअधिकारी यांची माहिती.