पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांचा धडाका आजपासून महाराष्ट्रात सुरु होत असून पुढील 2 दिवसांमध्ये पंतप्रधान राज्यात तब्बल 6 मतदरासंघांमध्ये सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आज अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. दिवसभरातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत…
मोदींच्या आजच्या सभा कुठे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या. आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाकडे आहे. त्यासाठी आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा होतायत.









