Search
Close this search box.

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई आणि ठाण्यात असंख्य विद्यार्थी ही शाळेत स्कूलबसने जातात. मुंबईचा विचार केला तर अनुदानित, खासगी शाळांमधील सुमारे 80 टक्के विद्यार्थी हे खासगी बस किंवा व्हॅन, रिक्षांने शाळेत ये जा करतात. त्यात राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा बस चालक संघटनेने विरोध केलाय. (school after nine in the morning government decision School bus drivers strike warning)

काय आहे नेमकं प्रकरण ?
शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या शाळेच्या टायमिंगबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांना इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यारती रात्री उशिराने झोपतात आणि सकाळी शाळेसाठी त्यांना उठावं लागतं. अशामध्ये त्यांची झोप होत नाही याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर होतो. अनेक गोष्टींचा अभ्यास करुन राज्य सरकारने शाळांच्या टायमिंगबद्दल निर्णय घेताल आहे.

…म्हणून स्कूल बसचालकांचा विरोध!
मात्र राज्य सरकारच्या पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरण्यास स्कूल बस चालकांनी विरोध केलाय. एवढंच नाही राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. स्कूल बस संघटनेनुसार मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये 9 नंतर वाहतूक कोंडी वाढते. अशावेळी या वाहतूक कोंडीतून मुलांना वेळेत शाळेत पोहोचवणे अवघड असल्याच स्कूल बस चालकांकडून सांगण्यात आलंय.
त्याशिवाय या निर्णयानंतर बस गाड्यांची संख्या ही वाढवावी लागणार आहे. त्यासोबत मनुष्यबळ वाढणार आणि इंधनाचा खर्चही वाढणार. या सर्वांचा खर्च पालकांच्या माथी मारल्या जाणार तो वेगळा. म्हणून सरकारने या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा, असं बस चालक संघटनेने म्हटलंय.

admin
Author: admin

और पढ़ें