गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत… या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. ठाण्यातही गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय.. ठाण्यातील ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास’ ही संस्था दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नववर्ष शोभायात्रेचं आयोजन करते…यंदाचं नववर्ष शोभायात्रेचं आणि पालखी सोहळ्याचं २४वं वर्षं आहे.. ठाण्यातील तरुणाई पारंपारिक वेषभूषेत या शोभायात्रेत सहभागी झालीये..
