अपराध समाचारदेश

मैत्रीच्या नात्याला काळीमा! मित्राचा खून करुन त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार

दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील तरुण बेपत्ता आहे. या बेपत्ता तरुणाच्या तपासकामी कोपरगाव शहर पोलीस अॅक्टीव्ह झाले आहेत. यात धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यानंतर पोलिसांनी बेपत्ता तरुणाच्या अल्पवयीन प्रेयसीचा शोध घेतला आणि अल्पवयीन प्रेयसीला गंगापूर तालुक्यातून ताब्यात घेतले.शहर पोलिसांच्या तपासा दरम्यान सदर बेपत्ता तरुणाचा खून झालं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर प्रेयसीला ताब्यात घेताच तिच्या प्रियकराचे खुनाचे गूढ उकलले आहे.

कोपरगांव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आरोपीचा मित्राच्या प्रेयसीवर डोळा होता. त्यामुळे त्याने मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत मित्राचा घात केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर अन्य एका मित्राच्या सहकार्याने त्याच्या अल्पवयीन प्रियसीवर अतिप्रसंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर खून बलात्कार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 जानेवारी 2024 रोजी घडली होती. यात पिडितेला धमकावण्यात आल्याने ती पोलिसांपर्यंत पोहचली नाही. धीर एकवटून तिने 21 मार्च रोजी कोपरगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मित्राचे प्रेमसंबंध डोळ्यात खुपले
आरोपी अर्जुन उर्फ भूर्ज्या गोपाल पिंपळे असे मुख्य आरोपीचे नाव असून तो कोळपेवाडी येथे राहतो. तर नागेश चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून तो 23 वर्षांचा होता. नागेश आणि त्याच्या प्रेयसीचे प्रेमसंबंध आरोपी मित्र अर्जूनला खुपत होते.

आरोपींमध्ये महिलेचाही समावेश
नागेश आणि त्याची प्रेयसी एका खोलीत असताना आरोपी अर्जुन त्याच्या जवळ गेला. येथे दोघांमध्ये भांडण झालं. घरात भांडण चालू झाले. अर्जुनने नागेशला खाली पाडून त्याचे दोन्ही हात दाबून ठेवले. तसेच दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. या आरोपींमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे.

चाकूचा धाक दाखवून बलात्कार
आरोपी अर्जुन एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मित्राच्या प्रेयसीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस निरिक्षक संदिप कोळी हे पुढील तपास करीत असून आरोपी अर्जुन पिंपळे यास 21 मार्च रोजी पहाटे कोळपेवाडी येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीस कोपरगाव न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Related Articles

Back to top button